दिग्दर्शक - सचित पाटील
कलाकार - भारत जाधव, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, कादंबरी कदम, शुभांगी गोखले, जयराज नायर, नितीन जाधव, मानवा नाईक, हेमंत ढोमे, मौलिक भट आणि पूजा सावंत
संगीतकार - ऋषिकेश कामेरकर
गीतकार - गुरु ठाकूर
वर्ष - २०१०
To Download This Song :
पावलांना साद देती या दिशा
सनन सन सूर हे नवे
फुलून मन गाई त्या सवे
ओठांवर येई सरगम
भिरभिर या अंबरी, नभाच्या उरी
वाटते उंच उंच विहरावे
रंग निळे जांभळे, ऊन कोवळे
लेउनी पंखांवर मिरवावे
वारयातले सूर फुलवीत यावी ओठांवरी
यावी ओठांवरी सरगम
गहिवरल्या या क्षणी, वाटते मनी
रेशमी स्वप्न नवे उमलावे
नकळत यावे कुणी, मेघ होऊनी
हरपुनी भान असे बरसावे
मौनातले अर्थ खुलवीत यावी ओठांवरी
यावी ओठांवरी सरगम