दिग्दर्शक - केदार शिंदे
कलाकार - सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, मोहन जोशी, स्मिता जयकर, कमलाकर सातपुते, शलाका पवार
संगीतकार - निलेश मोहरीर
गीतकार - अश्विनी शेंडे
वर्ष - २०१०
To Download This Song :
बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला
ये ना जरा तू, ये ना जरा चाहूल हलके दे ना जरा
ये ना जरा तू, ये ना जरा चाहूल हलके दे ना
झिम्माडं पाऊस, तू नको जाऊस
चुकारं ओठ हे बोले
श्वासातं थरथर, सरीवर सर
मन हे आतूर झाले
ये ना जरा तू, ये ना जरा मिठीत हलके घे ना जरा
ये ना जरा तू, ये ना जरा मिठीत हलके घे ना
भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा
बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला
स्पर्शात वारे, निळे पिसारे
आभाळ वाहून गेले
तुझ्यात मी अन माझ्यात तू
कसे दोघात जग हे न्हाले
ये ना जरा तू, ये ना जरा मिटून डोळे घे ना जरा
ये ना जरा तू, ये ना जरा मिटून डोळे घे ना
भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा
बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला