दिग्दर्शक - सचिन पिलगावकर
कलाकार - सचिन पिलगावकर, अशोक सराफ, महेश कोठारे, भार्गवी चिरमुले आणि निर्मिती सावंत
संगीतकार - अवधूत गुप्ते
गीतकार - प्रविण दवणे
वर्ष - २०१०
To Download This Song :
खुल्या जगाची रीत विसरून ये ना
मनातले हे मन समजून घेना
पाहत होतो वाट वेडापरी ना
केलीस बात राणी हृदयातली ना
लाजून लाली बेभान झाली
धावत आले लाटेपरी मी
बाहूत घेन्या वेड्या नदीला
आतुर आहे दरिया परी मी
गुज फुलले रे अधरावरी ना
पाहत होतो वाट वेडापरी ना
केलीस बात राणी हृदयातली ना
खुल्या जगाची रीत विसरून ये ना
मनातले हे मन समजून घेना
तोरण लागे आज घराला
मनातल्या या सनई सुरांचे
झालीस राजी होशील माझी
नादावूनी गीत नाचे मनाचे
डोळ्यांनी बोलूया आभाळ तोलुया
जातील रंगून दाही दिशा ना
पाहत होतो वाट वेडापरी ना
केलीस बात राणी हृदयातली ना
खुल्या जगाची रीत विसरून ये ना
मनातले हे मन समजून घेना
घडी सुखाची तुझ्या रुपाची
मोहरूनी बघ आला शहारा
अटीतटीची भोळ्या अटीची
आतुनी कोणी देयीना रा इशारा
घडुदे काही ही जडले मन ही
आले जर कोणी आड धडा शिकव ना
खुल्या जगाची रीत विसरून ये ना
मनातले हे मन समजून घेना
पाहत होतो वाट वेडापरी ना
केलीस बात राणी हृदयातली ना
लाजून लाली बेभान झाली
धावत आले लाटेपरी मी
बाहूत घेन्या वेड्या नदीला आतुर आहे दरिया परी मी
गुज फुलले रे अधरावरी ना
पाहत होतो वाट वेडापरी ना
केलीस बात राणी हृदयातली ना
खुल्या जगाची रीत विसरून ये ना
मनातले हे मन समजून घेना