वर्ष - २००८
To Download This Song :
झिळमिळत्या रंगांचे गारूड अजून मला पुरते न कळे
ती मुरली ती तुडूंब यमुना कदंभ फुलले काठी
खरेच का तो होता तिथला गोकुळचा रहिवाशी
खरीच होती राधा अन तो रास खरा होता का
नवलपरीच्या लीला त्याच्या भासत तो होता का
त्या अविनाशी मोलपनाचे रहस्य हि पुरते न कळे
झिळमिळत्या रंगांचे गारूड अजून मला पुरते न कळे
तो तर होता गोपसखा की तरुण प्रियकर होता
धीट किती तो लोकप्रिय किती नित्य अग्रणी होता
मधु वचनी तो मुरली मनोहर रूपवंत वेल्हाळ
समय ज्ञनी तो चतुर जाणता शत्रूंजय कळीकाळ
त्या नीत नूतन शतरूपांचे रहस्य हि पुरते न कळे
झिळमिळत्या रंगांचे गारूड अजून मला पुरते न कळे
तो बंधू तो पती पिता तो परममित्र तो राजा
तो दृष्टा उपदेशक प्रेरक आश्रय तो सकलांचा
सर्वांसाठी सदहृदय तरीही तो तर त्या पलीकडचा
आलीप्त सावध निर्मम साक्षी सगळ्या सुख-दुखा:चा
अपूर्व त्या जीवनयोगाचे रहस्य हि पुरते न कळे
झिळमिळत्या रंगांचे गारूड अजून मला पुरते न कळे
सर्व मानवी नात्यांना अती सुंदर केले त्याने
आयुष्याला अर्थ दिला रसभरल्या चैत्यन्याने
काय म्हणावे काय नेमके द्यावे त्याला नाव
काळाचा होता का स्वामी तो होता का देव
गुढ निळया त्या अस्तिवाचे रहस्य हि पुरते न कळे
झिळमिळत्या रंगांचे गारूड अजून मला पुरते न कळे
अजून तरळते दृष्टीपुढती ते मोराचे पीस निळे
झिळमिळत्या रंगांचे गारूड अजून मला पुरते न कळे
अजून मला पुरते न कळे