दिग्दर्शक - संजय सूरकर
कलाकार - रीमा लागू, मानसी साळवी, श्रेयस तळपदे, अंकुश चौधरी, सुबोध भावे, उर्मिला कानिटकर, राहुल बोडस
संगीतकार - अशोक पत्की
गीतकार - सौमित्र
वर्ष - २००६
To Download This Song :
ऋतू पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात
(झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची)
सर येते माझ्यात
माती लेऊनिया गंध होत जाते धुंद धुंद
तिच्या अंतरात खोल अंकुरतो एक बंध
मुळे हरखुनि जातात, झाडे पाऊस होतात
ऋतू पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात
(झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची)
सर येते माझ्यात
(सुंबरान गाऊया रं, सुंबरान गाऊया
झिलरी झिलरी आम्ही तुम्ही सुंबरान गाऊया
सुंबरान गाऊया रं, सुंबरान गाऊया)
जीव होतो ओलाचिंब, घेतो पाखराचे पंख
सार्या आभाळाला देतो एक ओलसर रंग
शब्द भिजुनी जातात, अर्थ थेंबांना येतात
ऋतू पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात
(झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची)
सर येते माझ्यात