वाहिनी - झी मराठी
संगीतकार - कौशल इनामदार
गीतकार - कुसुमाग्रज
To Download This Song :
हिच्या संगाने जागल्या दर्याखोर्यातील शिळा
हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात
नाही पसरला कर कधी मागायास दान
स्वर्णसिंहासनापुढे कधी लवली न मान
हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगे जागतील मायदेशांतील शिळा