दिग्दर्शक - सचिन पिलगावकर
कलाकार - सचिन पिलगावकर, अशोक सराफ,महेश कोठारे, भार्गवी चिरमुले आणि निर्मिती सावंत
संगीतकार - अवधूत गुप्ते
गीतकार - प्रविण दवणे
वर्ष - २०१०
To Download This Song :
पावणं तुमची नजर साधी नाई (3)
असं इथं तिथं बघनं बर ह्याई का (2)
अव बघल कुणी तरी (2)
पावणं बघल कुणी तरी आम्ही नाही जा
आम्ही नाही जा (4)
आम्ही नाही, आम्ही नाही आम्ही नाही जा...
अव बघल कुणी तरी आम्ही नाही जा
चूक नाही माझी पोरी हाई रूप तुझ कारण
तुला करीन राणी भले जीव ठेव तारण
तुझा भास होतो अन मन नाच मोरावाणी
मला सांग तुला बघू कस मी ग चोरावाणी
घ्या पाहून एकदा अन मान वळवा
चिट्टीतन मला उद्या हाल कळ्वा
रंग वरवरले हे उरले त सांगा
रातभर तुम्ही नाही झुरले त सांगा
असं इथं तिथं बघनं बर नाही ना (2)
अव बघल कुणी तरी (2)
दाजी बघल कुणी तरी
आम्ही नाही जा (4)
आम्ही नाही, आम्ही नाही आम्ही नाही जा...
अव बघल कुणी तरी आम्ही नाही जा
नदीच्या पाण्यावाणी, कणसाच्या दाण्यावानी
गं तुझ हसणं गोड, पाखराच्या गाण्यावानी
पावसाच्या थेंबान शहांरत पान
तसं नजरेन एक हरवलं भान
अंग गहिवरल जी मी झाले वेडी
ही नजर तुम्ही हटवा की थोडी
असं एकटक बघनं बर नाही ना (2)
अव बघल कुणी तरी (2)
राया बघल कुणी तरी आम्ही नाही जा
आम्ही नाही जा (4)
आम्ही नाही, आम्ही नाही आम्ही नाही जा...
अव बघल कुणी तरी आम्ही नाही जा