दिग्दर्शक - गिरीश मोहिते
कलाकार - संजय नार्वेकर, मकरंद अनासपुरे, मोहन जोशी, ऋतुजा देशमुख, कादंबरी देसाई, नैन्तारा, रवींद्र बेर्डे, उदय सबनीस, जयवंत वाडकर, सौरभ पारखे, विकास समुद्रे
संगीतकार - संदीप खरे
गीतकार - संदीप खरे
वर्ष - २००७
To Download This Song :
आणि तिच्या हातांनीच जखमा या भर
कधीतरी कुठेतरी बसावी धडक
कळ मला यावी तिला कळावे तडक
घायाळाला मिळो एक घायाळ नजर
अपघाती सोंग माझे वाटावे खरे
तिला येता प्रेम मला वाटावे बरे
दवा-दारुमध्ये कुठे असतो असर
खरी व्यथा तेव्हा मग सांगेन तिला
विचारेल जेव्हा कुठे दुखते तुला
जरा डावीकडे जरा पोटाच्या या वर
टेकवता छातीवर डोके एकवार
ठोका घेई झोका उडे आभाळाच्या पार
व्यथांचाच काय पडे जगाचा विसर