दिग्दर्शक - सचित पाटील
कलाकार - भारत जाधव, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, कादंबरी कदम, शुभांगी गोखले, जयराज नायर, नितीन जाधव, मानवा नाईक, हेमंत ढोमे, मौलिक भट, पूजा सावंत
संगीतकार - ऋषिकेश कामेरकर
गीतकार - गुरु ठाकूर
वर्ष - २०१०
To Download This Song :
क्षणभर विश्रांती मोहरण्यासाठी
विरलेल्या नात्यांना विझलेल्या आशांना
चुकलेल्या वाटानाही समजावून घेण्यासाठी
क्षणभर विश्रांती...
दूरची वाट अन स्वप्नातली दूर गावे
जायचे नेमके कोठे कुणाला न ठावे
थांबती, संपती जुळती नव्या रोज वाटा
सूर त्यांच्यासवे या जीवनाचे जुळावे
विरलेल्या नात्यांना विझलेल्या आशांना
चुकलेल्या वाटानाही समजावून घेण्यासाठी
क्षणभर विश्रांती...
आवरावे जरा बेभानल्या पावलांना
सावरावे जरा स्वप्नाळल्या लोचनांना
गीत ओठी नवे घेवूनी या जीवनाचे
गुंतवावे जरा भांबावलेल्या मनाला
विरलेल्या नात्यांना विझलेल्या आशांना
चुकलेल्या वाटानाही समजावून घेण्यासाठी
क्षणभर विश्रांती..