काव्यवाचन - जयश्री कुळकर्णी अंबासकर
संगीतकार - अभिजीत राणे
गीतकार - जयश्री कुळकर्णी अंबासकर
वर्ष - २००९
To Download This Song :
स्वप्नील डोळ्यांची उघडझाप करत
जेव्हा तू बोलायचीस माझ्याशी
कान माझे चक्क फितूरी करायचे
मात्र डोळे होते प्रामाणिक माझ्याशी
'असा काय रे बघतोस हरवल्यासारखा........'
तू म्हणायचीस नेहेमी
'अगं, मलाच शोधतोय तुझ्या डोळ्यात
सारखा हरवतो माझा मी'.
'तुझं आपलं काहीतरीच......'
तू टिंगल करायचीस माझी
पण ते लाजरं खळीतलं हसू तुझं
अगदी खरं बोलायचं माझ्याशी
सूर्याचं अस्ताला घाईघाईने जाणं
अन तुझं गडबडीनं उठणं
रेंगाळलेली किरणं गोळा करत
माझं उद्याची वाट पहाणं
'येते रे' म्हणतानाची तुझी व्याकुळ नजर
ओढाळ पावलं अन ओली पापण्यांची झालर
पाठमोरी डोळ्यात साठवलेली तू
अन अजूनही हरवलेला मी
अन अजूनही हरवलेला मी
जे जे मला हवेसे सारे तुझ्यात आहे
तेजाळती कशा या बंदिस्त दोन ज्योती
ही आगळी दिलेरी तव काजळात आहे
ह्या सावळ्य़ा मुशीचे सौंदर्य जीवघेणे
जादू परी तुझी या साधेपणात आहे
स्वीकारुनी गुलामी बेचैन रात आहे
चंद्रात आज माझ्या ही खास बात आहे
संकेत हे गुलाबी, आवेग हा शराबी
केसात माळलेल्या या मोगर्यात आहे
ही आग मारव्याची ह्या गारव्यात आहे
गाफ़ील यौवनाची संपूर्ण मात आहे