दिग्दर्शक - राजीव पाटील
कलाकार - उपेंद्र लिमये आणि मुक्त बर्वे
गीतकार - अजय-अतुल
गीतकार - संजय पाटील
वर्ष - २००९
To Download This Song :
घालू जागर जागर डोंगर माथ्याला...
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार आलो दुरुन रांगून डोंगर येंगुन उघड देवी दार
नदीच्या पान्यावर आईला पूजत, तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं
नाद आला गं आला गं जिवाच्या घुंगराला...
घे लल्हाटी भंडार, दूर लोटून दे अंधार आलो दुरुन रांगून डोंगर येंगुन उघड देवी दार
नवसाला पाव तू, देवी माझ्या हाकंला धाव तू,
हाकंला धाव तू, देवी माझ्या अंतरी र्हाव तू,
देवी माझ्या अंतरी र्हावं तू, काम क्रोध परतुनी लाव तू
काम क्रोध परतुनी लाव तू , देवी माझी पार कर नाव तू
डोळा भरून तुझी मूरत पाहीन मूरत पाहीन, तुझा महिमा गाईन
महिमा गाईन तुला घुगर्या वाहीन, घुगर्या वाहीन तुझा भंडारा खाईन
द्रुष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला, द्रुष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार आलो दुरुन रांगून डोंगर येंगुन उघड देवी दार
यलम्मा देवीचा जागर ह्यो भक्तीचा सागर
प्रेमाची भाकर दाविती ही, जमल्या गं लेकरं
हेऽऽ पुनवंचा चांदवा देवीचा गं मायेचा पाझर
आई तुझा मायेचा पाझर, सागर ह्यो- भक्तीचा सागर
खणानारळानं ओटी मी भरीन,
ओटी मी भरीन, तुझी सेवा करीन
सेवा करीन, तुझा देव्हारा धरीन
देव्हारा धरीन,माझी ओंजळ भरीन
आई सांभाळ सांभाळ तुझी च लेकराला
आई सांभाळ सांभाळ तुझीच लेकराला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार आलो दुरुन रांगून डोंगर येंगुन उघड देवी दार
यलम्मा देवीचा जागर ह्यो भक्तीचा सागर
प्रेमाची भाकर दाविती ही, जमल्या गं लेकरं
हेऽऽ पुनवंचा चांदवा देवीचा गं मायेचा पाझर
आई तुझा मायेचा पाझर सागर ह्यो- भक्तीचा सागर