दिग्दर्शक - केदार शिंदे
कलाकार - संजय नार्वेकर, प्रियांका यादव, दिलीप प्रभावळकर, रेखा कामत
संगीतकार - अजय-अतुल
गीतकार - गुरु ठाकूर
वर्ष - २००४
To Download This Song :
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते,
मन उधाण वा-याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान ? कसे गहिवरते ?
आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते,
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते,
सावरते, बावरते , घडते, अडखळते, का पडते,
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते,
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते,
अन क्षणांत फिरूनी आभाळाला भिडते,
मन उधाण वा-याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान ? कसे गहिवरते ?
रूणझुणते, गुणगुणते , कधी गुंतते , हरवते,
कधी गही-या डोळ्यांच्या डोहात पार बुडते,
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते ?
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते,
जाणते तरी हे पुन्हा पुन्हा का चुकते ?
नावडे तरी भासांच्या मागून पळते ?