दिग्दर्शक - राज दत्त
कलाकार - सचिन पिलगावकर, वंदना पंडित, पद्मा चव्हाण, राजा गोसावी
संगीतकार - अनिल-अरुण
गीतकार - शांता शेळके
वर्ष - १९७९
To Download This Song :
प्रीत तुझी माझी फुलावी, या फुलत्या वेलीपरी
भाव मुके ओठांत यावे, गंध जसा सुमनांतरी
शब्दाविना मन भावना, अवघ्याच मी तुज सांगते
हात तुझा हाती असावा, साथ तुझी जन्मांतरी
मी तुझिया मागून यावे, आस ही माझ्या उरी
तुज संगती क्षण रंगती, निमिषात मी युग पाहते
स्वर्ग मिळे धरणीस जेथे, रंग नवे गगनांगणी
सप्तसूरा लेऊन यावी, रागिणी अनुरागिणी
तुझिया सवे सूख-वैभवे, सौभाग्य हे नित मागते