संगीतकार - अभिजीत राणे
गीतकार - प्राजक्ता पटवर्धन
वर्ष - २००९
To Download This Song :
मन माझं थेंब थेंब होऊन सारं भिजतय गं
या नभाची मेघ वेडी आस जागते
पाचूच्या मी गर्दरानी चिंब चिंब नाहते
नभं कसं दूर दूर निळ-काळं घनभर दिसतय गं
पदर हिरवागार सोडुनिया तो पार
नदी वाहते चिंब नाहते
कधी ती मोहक खास
नभात चुकला श्वास वेड लावते
त्या नदीचे चिंब गाणे कोणी ओठी गायले
पावसाचे हे तराणे कोणी येथे छेडले
नभं कसं दूर दूर निळ-काळं घनभर दिसतय गं
या गंधल्या आसमंती साज लेवुनी सतरंगी
रुणझुणती पाउले ग ओलावली अंतरंगी
नाद रानात घुमून राही
आल्या फुलून दिशा या दाही
लाजरी ग साजरी ग श्रावणाची प्रीत वेडी
रवी कोवळा कोवळा होई
झाल्या तरुण जाई नी जुई
मेघ वेडा या जगाला सांगे पावसाची खोडी