संगीतकार - श्रीधर फडके
गीतकार - प्राजक्ता पटवर्धन
वर्ष - २००१
To Download This Song :
माहेरच्या दिसांचा, क्षण काळ भास झाला
पहिल्याच सरीचा, ओला सुवास आला
ओली सुकी सुखाची, बोली मुखी मुखाची
घाटात वाट होती, कोंदाठल्या धुक्याची
आला वळीव आता, हा नेमका कशाला
पहिल्याच सरीचा, ओला सुवास आला
हुंकार त्या दिश्यांना, फुटले निळे धुमारे
बघ गारवा थरारे, उबदार हे शहारे
रेंगाळत्या धुपाने, का भारले मनाला
पहिल्याच सरीचा, ओला सुवास आला
मेघामधुन आले, हे ऊन कोवळेसे
ओसंडले सभोवती, आकाश सावळेसे
वृंदावनात आला, गोपाळकॄष्ण काळा
पहिल्याच सरीचा, ओला सुवास आला