दिग्दर्शक - सचिन पिळगांवकर
कलाकार - सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिलगावकर, अशोक सराफ, निवेदिता सराफ, संजय जोग
संगीतकार - अनिल-अरुण
गीतकार - शांताराम नांदगावकर
वर्ष - १९८४
To Download This Song :
झीर मीर झीर मीर पाऊस धारा
भिर भिर करी मदनाचा वारा
ये ना सजना ये ना
भिजली पाने वेली आसमंत हा
अंगी फुलुनी आला रे वसंत हा
प्रीत जळी भिजोनी तू ये ना
अलगद मज हृदयाशी घे ना
हरणी आली दारी धुंद होऊनी
होणा तूच शिकारी डाव टाकुनी
नेम असा धरुनी तू ये ना
सावज हे तू वेधून घे ना
सावज होई शिकारी जादू पाहुनी
घायालांची प्रीती आली रंगुनी
नयनांचे शर मारू नको ना
प्रीत फुला तू जवळी ये ना