संगीतकार - मिलींद इंगळे
गीतकार - सौमित्र
वर्ष - १९९९
To Download This Song :
पाणी झरत चालले आज आभाळ फाटलेपावसाला पावसाने वर ढगात गाठले
पाणी झरत चालले झाड झाडाच्या मीठीत
आता झाडाच्या भवती रान आगीच्या ढगीत
पाणी झरत चालले नदी सागर भरती
वाळू ओलावली सारी दोन्ही किनारयावरती
पाणी झरत चालले उभ्या रानाला तहान
आता किलबिलताहे झाडाझाडातून पाखरं
पाणी झरत चालले आज आभाळ फाटले
पावसाला पावसाने वर ढगात गाठले
रानी वनी, पानोपानी, मन पाऊस पाऊस
माती खाली खोल खोल, ओल मातीच्या मनास
मातीवर थरथरे, ओला सुवास सुवास
पावसाळी पायवाटा, जरा उदास उदास
दाही दिशांत पाखरे, जणू आभास आभास
रान मोकळे मोकळे, बघे भारुन नभास
त्याचा हिरवा हिरवा, आज प्रवास प्रवास