28
May
संगीतकार - शेखर रावजीनी
गीतकार - रवी जाधव
वर्ष - २०१२
To Download This Song :
कावरे मन हे झाले तू येना साजणी
साजणी छळतो मज हा मृद्गंध
तुझ्या स्पर्शासम धुंद तू येना साजणी
सळसळतो वारा गारगार हा शहारा
लाही लाही धरतीला चिंब चिंब दे किनारा
तुझ्या चाहुलीनं ओठी येती गाणी, साजणी
रिमझिम रिमझिम या नादानं बाई शिवार झालं बेभान
सई भिजूया रानात मनात पानात बरसूदे सोन्याचं पानी
हुरहूर लागी जीवा नको धाडू ग सांगावा
येना आता बरसत येना
साजणी.... मैत्रिणी .....
हुरहूर लागी जीवा नको धाडू ग सांगावा
येना आता बरसत येना
गुणगुणते हि माती लवलवते हि पाती
सर बरसे सयींची रुजवाया नवी नाती
तुझ्या चाहुलीनं ओठी येती गाणी, साजणी ...