13
Apr
संगीतकार - अजय-अतुल
गीतकार - श्रीरंग गोडबोले
To Download This Song :
त्या आईला वैभवी नेऊया
इतिहास तुजा गौरव शाली
तो घेउनी सवे
सामोरी जा त्या भविष्यास
जे येई उदया नवे
तुज पुढती या मार्गावरती
आव्हान असे खडे
चल टाक मराठी बांधावा पाऊल तुझे पुढे
ध्यास नवा स्वप्न नवे यज्ञ नवा पर्व नवे
स्वर्गाहुन सुंदर महाराष्ट्राला
जगी सर्वोत्तम स्थानावर्ती नेऊया
आहोत ज्या भूमी ची लेकरे
त्या आईला वैभवी नेऊया
घे मर्द मराठ्या शपथ आता त्या शिवबा रायाची
लढण्याची अन मरणाची पण जग जिंकून घेण्याची
उतुंग भरारी घेऊ आता नव क्षितिजा कडे
चल टाक मराठी बांधावा पाऊल तुझे पुढे
ध्यास नवा श्वास नवा
भाग्याहून भाग्य हे
ती लाभली आई अशी , भूमी अशी
केले संस्कार ते जोपासले, ममतेतुनी हि संस्कृती
ह्या सह्य पर्वता सारखा ताठ पाठीचा हा कणा
तुकविल ना कधी मान सोडील ना मराठी बाणा
मन हे विशाल त्या धीर सागरा सारखे भव्य ते
हि प्रेम गंगा सवे शौर्य च्या या इथे वाहते
जन्म नवा प्राण नवे जोश नवा व्यर्थ नव्हे
हि माय मराठी मातेची नव गाथा
मन गाई आता ठेउन चरणी माथा
मातीत या जन्मलो वाढलो त्या आईला वैभवी नेऊया
घे मर्द मराठ्या शपथ आता त्या शिवबा रायाची
लढण्याची अन मरणाची पण जग जिंकून घेण्याची
उतुंग भरारी घेऊ आता नव क्षितिजा कडे
चल टाक मराठी बांधावा पाऊल तुझे पुढे
जन्म नवा श्वास नवा स्वप्न नवे