7
May
दिग्दर्शक - राजदत्त
कलाकार - रवींद्र महाजनी, रंजना, प्रिया तेंडूलकर
संगीतकार - विश्वनाथ मोरे
गीतकार - जगदीश खेबूडकर
वर्ष - १९८४
To Download This Song :
ओल्या मिठीत आहे, हा रेशमी निवारा
हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
ओल्या मिठीत येतो, अंगावरी शहारा
मी कालचीच भोळी, मी आज तीच येडी
ही भेट येगळी का, न्यारीच आज गोडी
का भूल ही पडावी, वळखून घे इशारा
होते अजाणता मी, ते छेडले तराणे
स्वीकारल्या सुरांचे, आले जुळून गाणे
हा रोम रोम गाई, गातो निसर्ग सारा