14
May
दिग्दर्शक - जब्बार पटेल
कलाकार - स्मिता पाटील, गिरीश कर्नाड, श्रीकांत मोघे, आशालता वाबगांवकर, कुसुम कुलकर्णी, राधा कर्नाड, सतीश आळेकर, मुकुंद चितळे
संगीतकार - पं. हृदयनाथ मंगेशकर
गीतकार - सुरेश भट
वर्ष - १९८२
To Download This Song :
अजूनही वाटते मला की, अजूनही चांदरात आहे
कळे न मी पाहते कुणाला ? कळे न हा चेहरा कुणाचा ?
पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे !
सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे !
उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू ?
दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे ?