12
May
दिग्दर्शक - नितीन चंद्रकांत देसाई
कलाकार - फिलीप स्कॉट, सोनाली कुलकर्णी, मनोज कोल्हटकर, अविनाश नारकर, रीना अग्रवाल, मुरली शर्मा, मकरंद देशपांडे, मनोज जोशी
संगीतकार - कौशल इनामदार
गीतकार - ना.धों. महानोर
वर्ष - २०१२
To Download This Song :
भरली तिची ओटी, भरली तिची ओटी
जगजेठी...
येऊ दे गा रुक्मिणा तिच्या पोटी, रुक्मिणा तिच्या पोटी
जगजेठी...
महादेवा...
तुझ्या गा मंदिरात, तुझ्या मंदिरात
बेलपान वाहू रे दहिभात, वाहू रे दहिभात
महादेवा...
अवघा संसार
भरला नादारीनं, भरला नादारीनं
तरी नांदतो आम्ही आनंदानं, आम्ही आनंदानं
आनंदानं...
महादेवा...
पिकू दे पीकपाणी, पिकू दे पीकपाणी
होऊ दे रे खेड्यात आबादानी, खेड्यात आबादानी
जगजेठी...
जगजेठी...
भरली तिची ओटी, भरली तिची ओटी
जगजेठी...
येऊ दे गा रुक्मिणा तिच्या पोटी, रुक्मिणा तिच्या पोटी
जगजेठी...