8
May
दिग्दर्शक - नितीन चंद्रकांत देसाई
कलाकार - फिलीप स्कॉट, सोनाली कुलकर्णी, मनोज कोल्हटकर, अविनाश नारकर, रीना अग्रवाल, मुरली शर्मा, मकरंद देशपांडे, मनोज जोशी
संगीतकार - कौशल इनामदार
गीतकार - ना.धों. महानोर
मुक्तछंद अभिवाचन - विनय आपटे
वर्ष - २०१२
To Download This Song :
काठाकाठातला...झाडांच्या देठातला...
रंगभोर शिडकावा गोंदवून बसलेला...अजिंठा
चिंब झाली पावसाने दूर राने
गर्दशी ओली निळाई डोंगराने
मुक्त बेहोषीत आम्ही गीत गातो
वादळाचा देह आता झिंगल्याने
अजिंठा झाडांचा...झाडांच्या झुलत्या प्रवाही पाण्यातला...
लेनापूर फर्दापूरच्या गावंढळ गर्दीतला...
बंजारा वस्तीच्या होळीच्या थाळीवर थिरकत गेलेला...अजिंठा
पत्थरातुन निर्झरांचे शुभ्र पाणी
वाडीवस्ती गाती प्राणांतून गाणी
अजिंठा पिवळ्या जर्द शेतातल्या पिकातला...
बारादरीतला...काळ्या भोर दगडातला धबधबा झेलणारा...अजिंठा
तो जगाचा बुद्ध शांतीसाठी येथे
सांगती जातक् कथा त्यांची कहाणी
अजिंठा...जगाचे अहंकार मोडून बसलेला...
नामोनिशान नसलेल्या कुठल्याच हातांचे...
ह्या निर्मितीतल्या इथल्या दगडातल्या सृष्टीला...
पहिल्यांदाच चिरंतन प्रतिरूप देणारा...
उंच गेल्या डोंगरांच्या दोन रांगा
माखले शेवाळे भिजले अंग अंगा
मानवी तृष्णा अहंता लोभ सारे
खोदुनी पाळेमुळे कल्याण व्हावे
त्या कुण्या प्रतिभेतल्या बलदंड रेषा
कोण ते, कुठले, कुठे ही नाव नाही