दिग्दर्शक - संजय नार्वेकर
कलाकार - संजय नार्वेकर, पूजा सावंत, जितेंद्र जोशी, अतुल परचुरे, कमलाकर सातपुते, अरुण नलावडे, निवेदिता सराफ, विजू खोटे, पंढरीनाथ कांबळे
संगीतकार - अजय-अतुल
गीतकार - गुरु ठाकूर
वर्ष - २०११
To Download This Song :
अजय-अतुल ही संगीतकार जोडी म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीला पडलेले एक दिव्यस्वप्न आहे. मागील वर्षी मराठी चित्रसृष्टीला जोगवा व नटरंग मधील उत्तमोत्तम गीते त्यानी दिली. शिवाय राष्ट्रीय पुरस्कारही प्रथमच मराठीला मिळवून दिला. यंदा त्यांनी एक नवा प्रयोग मराठीतच नव्हे तर भारतीय चित्रपट सृष्टीला यशस्वी करून दाखविलाय. संजय नार्वेकरच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ’आता गं बया’ या चित्रपटात एकाही वाद्याचा वापर न करता केवळ तोंडाच्या वाद्यांनी गीत त्यांनी तयार केले आहे. " सजवून साज जशी ..." हें गीत " A cappella " पद्धतीत स्वरबद्ध केले आहे. या प्रकारात कोणतेही स्वर वाद्ये न वापरता फक्त " कंठ स्वरांचा " उपयोग करून गाणे स्वरबद्ध केले. संपूर्ण गाण्यात कंठ स्वरांचा वाद्यवृंद वापरून हे अप्रतिम गाणे तयार झाले. विशेष म्हणजे ह्या नव्या प्रकारच्या गाण्याची " लिम्का बुक्स " मध्ये नोद करण्यात आलेली आहे.
रुणझुण सांज तशी, सजनी तू रंगबावरी
सरल वार सुखाची... रिमझिमे जशी
छेडी अलगूज जणू, श्वासातूनी आज कुणी
हरपून भान अशी, मिठी तुझीच तशी
सजना मी सांज सावरी...
नजर तुझी ही प्रिया वेड लावी,
भिरभिरते मी अशी भोवताली,
गोऱ्यागोऱ्या गालावरी आज लाज आली,
अवखळ डोळ्यात ह्या प्रीत गीत झाली,
अशी भूल जीवाला या पडते,
मखमल मनी उलगडते,
काळजाच्या काठावर हलते,
छेडी कुणी तार जशी...
सजना मी सांज सावरी...
हरपून भान अशी, मिठी तुझीच तशी
सजना मी सांज सावरी...
सरल वार सुखाची... रिमझिमे जशी
छेडी अलगूज जणू, श्वासातूनी आज कुणी
सजवून साज जशी
रुणझुण सांज तशी, सजनी तू रंगबावरी
दव हळवे मी धुके धुंद व्हावे,
बिलगुन राणी तुला पांघरावे,
विसरून थांग सावली तुझीच व्हावे,
अलगद वाटे रे तुझ्यात मी भिनावे,
तुझ्यासाठी अशी तळमळते...
तुझ्याभोवताली घुटमळते...
पुनवेच्या चांदासाठी झुरते... वेडीपिशी रात जशी,
सजवून साज जशी
रुणझुण सांज तशी, सजनी तू रंगबावरी
सरल वार सुखाची... रिमझिमे जशी
छेडी अलगूज जणू, श्वासातूनी आज कुणी
हरपून भान अशी, मिठी तुझीच तशी
सजना मी सांज सावरी...