दिग्दर्शक - दिपक नायडू
कलाकार - अंकुश चौधरी, जितेंद्र जोशी, अमित फाळके, सुशांत शेलार, यतिन कार्येकर
संगीतकार - प्रणय प्रधान
गीतकार - नितिन दिक्षित
वर्ष - २००६
To Download This Song :
अग परी तू फक्त माझ्या, माझ्याच स्वप्नात ये
स्वप्न माझे तुला नेईन दुधी चांदण्या मध्ये
असेल किंवा निळा जलाशय माझ्या स्वप्नांमध्ये
विहार करूया आपण दोघे बसून नौके मध्ये
नको कुणीही तिसरा आता आपल्या दोघांमध्ये
थेंबाचे मोती लेऊन पावसाच्या पंखाने ये
अग परी तू फक्त माझ्या, माझ्याच स्वप्नात ये
अबलक घोडा असेल माझा मी राजा तू राणी
संसार सुखाचा करावयाला भरेल मी ग पाणी
चित्रकार मी तुझे चितारीन रूप आरस पाणी
दे सोडून तू सगळे आता बैस असी साजणी
थेंबाचे मोती लेऊन पावसाच्या पंखाने ये
अग परी तू फक्त माझ्या, माझ्याच स्वप्नात ये