दिग्दर्शक - अनंथ नारायण महादेवन
कलाकार - तेजास्वनी पंडित, ज्योती चांदेकर, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी
संगीतकार - अशोक पत्की
गीतकार - सुरेश भट
वर्ष - २०११
To Download This Song :
मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते
हि दुनिया पाषाणाची, बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे, नुसतेच उधळले होते
याचेच रडू आले कि, जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे, अश्रूत मिसळले होते
घर माझे शोधाया मी, वार्यापरी वणवण केली
जे दार खुले दिसले ते, आधीच निखळले होते
मी एकटीच त्या रात्री, आशेने तेवत होते
मी विझले तेव्हा सारे, आकाश उजळले होते
इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते