संगीतकार - वैशाली सामंत
गीतकार - अवधूत गुप्ते
वर्ष - २०११
To Download This Song :
गुंतली लोचने भान ना राहिले
गंध हा दरवळे, जीव हा विरघळे
आठवांच्या तुझा, मेघ हा पाझरे
थरथर ही स्वरातुनी
गहिवर ये दाटुनी
मन हळवे मन हळवे
फिरते कुठल्या धुंदीत हे ..
हा शहारा नवा, शिरशिरी ही नवी
हा तुझा ध्यास की तूच तू भोवती
सरगम छेडतो जरी
हरवून मी अधांतरी
रुणझुणती गुणगुणती भवती
फसवे भास तुझे