काव्यवाचन - मिलिंद गुणाजी
संगीतकार - कौशल इनामदार
गीतकार - मिलिंद गुणाजी
वर्ष - २०१०
To Download This Song :
जेव्हा येती कृष्णमेघ नभी
हलका करण्या भार जलाचा
रंग सुखाचा असतो तेव्हा
शाम सावळा करडा काळा
हरित सुखाची पखरण करिती
श्रावणातल्या रेशिमधारा
सारंगाच्या सुरात पिवळे
सुख खुलून ये माध्यानीला
सूर्य बिलगतो सुख होवुनी
संधिप्रकाशी लाल नभाला
सुख सुरीले पैंजण बनवी
मुक्त मनस्वी निळ्या झर्याला
शांत सुखाचा साज असे जणू
योग्यासम काळ्या डोहाला
रंग सुखाचे कणा कणावर
सभोवताली रंगून जो गेला तो जगला
रंग उतरतो कुंचल्यातुनी
आभाळातील रंगाराचा
रंग सुखाचा टिपण्यासाठी
आपुला कोरा कागद व्हावा
इंद्रधनुषी रंग असावे
आभाळाची उंची आणि
दहा दिशांना दार असावे
कल्पनेतल्या प्रासादांनी
भव्य असावे दिव्य असावे
असिमतेच्या सीमा भेदून
विश्वाला व्यापून उरावे
कल्पनेतल्या प्रासादातून
अजिंक्य व्हावे ईश्वर व्हावे
कल्पनेतल्या निर्माताचे
पाय मात्र मातीत रहावे