दिग्दर्शक - मिलिंद कवडे
कलाकार - भरत जाधव, मोहन जोशी, विनय आपटे, संदीप पाठक, पॅडी कांबळे, निशा परुळेकर, आरती सोळंकी, विशाखा सुभेदार, आनंदा कारेकर, जयराज नायर, गणेश मयेकर, सुहास भालेकर, प्रकाश भागवत, सतिश तारे, किशोर नांदलस्कर, जयंत सावरकर
संगीतकार - क्षितीज वाघ
गीतकार - गुरु ठाकूर
वर्ष - २०१२
To Download This Song :
मराठी चित्रपट म्हणजे तमाशा आणि लावणी. यांच्याशिवाय मराठी चित्रपट पूर्णच होऊ शकत नाही. एवढ्या वर्षांनंतरही लावणीने आपले महत्त्व कमी होऊ दिले नाही. अगदी आजची तरुण पिढीही या लावणीची चाहती आहे. म्हणुनच अनेक ठसकेबाज लावण्यां आजही लोक आवडीने ऐकतात, पाहतात. म्हणूनच ऑरेंजेन एण्टरटेण्मेट प्रस्तुत ‘येडयांची जत्रा’ या आगामी चित्रपटातून अभिनेत्री श्वेता तिवारीची एक भन्नाट लावणी प्रेक्षकांसमोर येणार आहे. तर सरोज खान यांनी या लावणीचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.
व्यक्ती तितक्या वल्ली’ या वाक्यप्रचाराचा प्रत्यय जेवढा शहरांमधून येतो, त्याहूनही अधिक गावपातळीवर पहायला मिळतो. गावातले अस्सल गावरान जीवन, तेथील भाषा-लहेजा, त्यांच्या जगण्यातल्या छोटया छोटया गोष्टी, इरसालपणाचे किस्से आणि त्यातून घडणा-या गमतीजमतीची रंगत काही औरच असते. शहरी सुविधांपासून वंचित असलेल्या अशा एका छोटयाशा गावात सरकारी ग्रामयोजना आल्यावर तेथील गावकरी त्याचा कशाप्रकारे स्वीकार करतात याचे मजेशीर चित्रण म्हणजे आगामी ‘येडयांची जत्रा’ हा मराठी चित्रपट. विनोदातून समाजपबोधनाचा संदेश देण्याचा आगळावेगळा प्रयत्न ‘येडयांची जत्रा’ या चित्रपटातून करण्यात आला असून येत्या 3 फेब्रुवारीला तो चित्रपटगृहात दाखल होतोय.
तीर नजरेचा सुटला गं बाई सुटला
पाव्हन मिशीत मधाळ हसला
गडी रंगीला हाकून तिथला
ज्याच्या ओढीन हा जीव झाला रे वेडा पिसा
काटा रुतला गं बाई रुतला…
काटा इश्काचा जिव्हारी रुतला
ओठावर लाली आली लाज माझ्या गाली
रंग माझा गोरा गोरा
त्याला भुलले मी अशी मदनाला रती जशी
लई भारी त्याचा तोरा
उभ्या गावाच्या आल हे ध्यानी
त्याला सांगावा धाडा वो कोणी
ज्याच्या ओढीन हा जीव झाला रे वेडा पिसा
काटा रुतला गं बाई रुतला…
काटा इश्काचा जिव्हारी रुतला
त्याच्या पायी आज नाव गाव
काही आठवेना माझ मला
हरवलं सूर ताल मोहक चालता
कळेना माझ मला
डोळ रातीला लागणा बाई
अर्ध्या रातीला चाहूल येई
ज्याच्या ओढीन हा जीव झाला रे वेडा पिसा
काटा रुतला गं बाई रुतला…
काटा इश्काचा जिव्हारी रुतला