दिग्दर्शक - आदित्य सरपोतदार
कलाकार - आदिनाथ कोठारे, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, भूषण प्रधान, सौमिल शृंगारपूरे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी, सुप्रिया मतकरी
संगीतकार - अजय नाईक
गीतकार - अजय नाईक आणि मंदार चोळ्कर
वर्ष - २०१२
To Download This Song :
कॉलेजची पाच वर्षे म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यातले मंतरलेले दिवस असतात. कॉलेजमधल्या तरूणाईचे भावविश्व रेखाटणारा 'सतरंगी रे' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
चित्रपटाची कथा इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला शिकणा-या विद्यार्थ्यांभोवती फिरते. त्यांना स्वत:चा बँड तयार करायचा असतो. रॉक बँड या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित हा चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी एक नवी पर्वणी ठरणार आहे. रॉक बँडची आवड असणार्या तरुणांना करिअर निवडताना येणारे प्रश्न, आपली आवड आपल्याला पैसा मिळवून देईल का याची असणारी भीती आणि आवड व करिअर यांचं द्वंद्व या चित्रपटात पाहायला मिळेल.
साहजिकच त्यांना घरातल्यांचा विरोध असतो. कॉलेज, संगीत, मैत्री, प्रेम, जीवन, करिअर या सगळ्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे आजच्या तरूणाईच्या मनातील कोलाहल टिपण्याचा प्रयत्न केला आहे.
सखे ग पैलतीरी
उरले ओघळते घाव
सखे ग पैलतीरी
कधी गहिवरल्या श्वासांनी
कधी नयनातील पाण्यानी
बुडले स्वप्नातील गाव
सखे ग पैलतीरी
आकाशीचा रंगही गहिरा
त्यात निखळला एक सितारा
मागितले अस्तित्व तुझे
अन पुसले माझे नाव
सखे ग पैलतीरी
मुक्या सुरातील अर्थ हि चुकले
पुन्हा उरातील श्वास हि थकले
जुन्या घरातील नवी सोंगटी
उधळून जाते डाव
सखे ग पैलतीरी