संगीतकार - पं. हृदयनाथ मंगेशकर
गीतकार - कवी ग्रेस
वर्ष - २००५
To Download This Song :
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते
ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया
तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील, जणू अंगी राघव शेला
स्तोत्रांत इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे