दिग्दर्शक - सुजय डहाकें
कलाकार - केतकी माटेगावकर, मदन देवधर, शिवराज वाईकर
संगीतकार - हृषिकेश-सौरभ-जसराज
गीतकार - मंदार चोळकर
वर्ष - २०१६
To Download This Song :
कसा जीव गुंतला
मनाला मनाचे वेड लागते पुन्हा पुन्हा
कसा हा जीव गुंतला
मनाला...
तुझे रूप असावे खळखळनाऱ्या मुक्त झऱ्याचे
तुझे स्पर्श असावे विरघळनाऱ्या शुभ्र धुक्याचे
हातात हात घे जरा ये जवळ ये ना जरा
स्वप्न साकारले हे जणू आभास झाला खरा
कधी तोल जावा कधी सावरावा हे पांघरून घेऊ चांदणे
या तुझ्या चाहूलीनी मुके शब्द होती बोलू लागतात स्पंदने
सांगू कुणाला कसा मी
माझ्या मनाची व्यथा मी
का राहिलो एकटा मी
हा कसा जीव गुंतला
तुझे श्वास असावे दळवळनारे गंध फुलांचे
तुझे प्रेम असावे उलगडणारे बंध मनाचे
शहारा सुखाचा गोड भासतो पुन्हा पुन्हा
कसा हा जीव गुंतला
इशारा हवासा रोज छेडतो पुन्हा पुन्हा
कसा हा जीव गुंतला
मनाला… ला ला ला ला...