27
Apr
दिग्दर्शक - नितीन चंद्रकांत देसाई
कलाकार - फिलीप स्कॉट, सोनाली कुलकर्णी, मनोज कोल्हटकर, अविनाश नारकर, रीना अग्रवाल, मुरली शर्मा, मकरंद देशपांडे, मनोज जोशी
संगीतकार - कौशल इनामदार
गीतकार - ना.धों. महानोर
वर्ष - २०१२
To Download This Song :
`अजिंठा’ ही केवळ तीन अक्षरे उच्चारताच डोळ्यापुढे अख्खी भारतीय संस्कृती, गौतम बुद्ध आणि इसवीसनापूर्वीची चित्र-शिल्पसंस्कृती उभी राहते. घोडय़ाच्या नालेच्या आकाराप्रमाणे असलेल्या येथल्या 30 लेण्यांत बुद्ध धम्म आणि संस्कृती शेकडो वर्षे वसत आहे. तत्कालिन चित्रकलेची एक समृद्ध परंपरा इथे वसली होती, जपली जात होती. परंतु मधल्या काळात ती निसर्गाच्या विळख्यात लुप्त झाली होती. नंतर ती उलगडली गेली, जगप्रसिद्ध झाली. आपला अभिमान ठरली. याच अजिंठय़ाच्या परिसरात आणि लेण्यांच्या साक्षीने एक अव्यक्त प्रेमकहाणी बहरली होती व तत्कालीन समाजाच्या जाचक विचारसरणीची बळी ठरली होती. ही प्रेमकहाणी आहे आदिवासी पारो आणि ब्रिटिश चित्रकार-अधिकारी रॉबर्ट गिल यांची. मराठमोळ्या संस्कृतीसह ती रजतपटावर आणत आहेत नितीन चंद्रकांत देसाई आपल्या आगामी `अजिंठा’ या चित्रपटाद्वारे.
`अजिंठा’ हा चित्रपट 18व्या शतकातील अजिंठा लेण्यांच्या शोधावर आणि तेथे घडलेल्या प्रेमकहाणीवर आधारलेला आहे. अठराव्या शतकात अजिंठय़ाच्या आसपास अनेक आदिवासी समाज राहत होते. ते त्यांच्या प्रथापरंपरा जपत होते. बौद्धधर्माचा जबरदस्त पगडा असलेल्या या लेण्यांचा नव्याने शोध लागल्यावर गौतम बुद्धाची मनोभावे सेवा करणारी पारो ही त्यातलीच एक. ती लौकिकार्थाने गौतम बुद्धाच्या चरणाशी लीन झालेली. पण चित्रांच्या जतनीकरणासाठी आलेल्या व योगायोगाने तिच्या संपर्कात आलेल्या मेजर रॉबर्ट गिलशी तिचे अनाहूतपणे मनोमिलन होते. जेव्हा रॉबर्टकडे रंग नसतात तेव्हा पारो त्याला नैसर्गिक रंग तयार करून देते आणि त्याची चित्रकारी सुरू होते. दोघांच्या भाषांत सातासमुद्रापारचे अंतर. पण जलालुद्दीन हा दुभाष्या त्यांच्या भावना एकमेकांना पोहोचवत असतो. हा चित्रकार पारोला आपली प्रेरणा मानून, तिला सतत नजरेसमोर ठेवून अजिंठय़ातील चित्रे चितारत असतो.
चित्रे पूर्ण झाल्यावर तो निघून जातो. पण जेव्हा तो पारोला भेटायला परत येतो तेव्हा एक अघटित त्याच्यासमोर वाढून ठेवलेले असते. त्या गावात आता पारो नसते. तिच्या फक्त आठवणी असतात. कारण पारो समाजाच्या रोषाची बळी ठरलेली असते. या पारोच्या आठवणींत रॉबर्ट गिल 17 वर्षे येथे राहतो. तिची समाधी उभारतो आणि अखेरचा श्वासही इथेच घेतो...साभार : अजिंठय़ाची पारो, शरद विचारे
चित्रे पूर्ण झाल्यावर तो निघून जातो. पण जेव्हा तो पारोला भेटायला परत येतो तेव्हा एक अघटित त्याच्यासमोर वाढून ठेवलेले असते. त्या गावात आता पारो नसते. तिच्या फक्त आठवणी असतात. कारण पारो समाजाच्या रोषाची बळी ठरलेली असते. या पारोच्या आठवणींत रॉबर्ट गिल 17 वर्षे येथे राहतो. तिची समाधी उभारतो आणि अखेरचा श्वासही इथेच घेतो...साभार : अजिंठय़ाची पारो, शरद विचारे
छुन छुन पायलिया बाजे रे पैरमा
छंद ओठातले गीत गाती नवे
गारवा ह्या नव्या पालवीला
हाथ हातातले सोडवेना सये
गच्च आकाश भेटे भुईला
या वसंतातला सृष्टीचा सोहळा
बिलगुनी गंध राणा वनाला
गौर लजवंतीचा केतकीचा मळा
पुष्कळा आज तू सोबतीला
छंद ओठातले गीत गाती नवे
गारवा ह्या नव्या पालवीला
संथ वाहे झरा दूरच्या डोंगरा
गर्द झाडीतले रंग ओले
बिलवरांचे तुझ्या गीत झंकारता
मोर डोळातले लाजले रे
छंद ओठातले गीत गाती नवे
गारवा ह्या नव्या पालवीला
चोळी ऐन्यातली नेसली हिरकणी
आज भरदार सिनगार ल्याली
माळताना फुले सैल केसातले
सोडवेना मिठी घट्ट झाली
छंद ओठातले गीत गाती नवे
गारवा ह्या नव्या पालवीला
हाथ हातातले सोडवेना सये
गच्च आकाश भेटे भुईला
लाल होरी आयी रे लालेरा खेतमा
छुन छुन पायलिया बाजे रे पैरमा