संगीतकार - निलेश मोहरीर
गीतकार - अश्विनी शेंडे
वर्ष - २०११
To Download This Song :
स्पर्शून आसवांना या मातीत ओल्या रुजावे
जरी दाटले आभाळ हे तरी नवा रंग हो..
घन आज बरसे मनावर हो..
घन आज बरसे अनावर हो..
चाहूल कुणाची त्यावर हो..
घन आज बरसे अनावर हो..
घेऊन गिरकी पानावरती थेंब उतरले
वाऱ्याच्याही पायी वाजती पैंजण ओले
ही भूल सावळी पडे, झिरपले धुके, हिरव्या रानावर हो..
अंगणातल्या मातीलाही सुचती गाणी
थेंब मोतिया खळखळ करती ओली नाणी
तो गंध भारतो पुन्हा मनास वेड्या.. शिडकावा पानावर हो..
मिटले आता मधले अंतर, पाऊस पडून गेल्यानंतर
घडून जाईल नाजुक ओले काही, मन होईल हळवे कातर
पाऊस येईल पुन्हा नीज मोडाया, मग येऊ भानावर हो..
घन आज बरसे मनावर हो..
घन आज बरसे अनावर हो..
चाहूल सुखाची त्यावर हो..
घन आज बरसे अनावर हो..