दिग्दर्शक - भीमराव मुडे, सचिन वर्तक
कलाकार - भारत जाधव, मकरंद अनासपुरे, प्रियल पाटील, हेमांगी कवी, लोकेश गुप्ते, सिद्धेश राणे, कुशल बद्रिके
संगीतकार - रोहन प्रधान
गीतकार - मनोज यादव, सचिन मोटे
वर्ष - २०१०
To Download This Song :
शोधून मला मी हरले, हरवून कुठे गेले
प्रीतीचे सारे रंग नवे, उधळून कुठे ते गेले
प्रेमाचे देऊन नाव ठाव, फसवून कुठे ते गेले
थांबून वाट बघतो कधी, सांगून वाट चुकतो कधी
जागून रात्र फिरतो कधी, का आठवून हसतो कधी
मन पाखरू प्रेमात धुंद, बेभान आज भिरभिरते
किती सावरू किती आवरू, प्रेमाच्या गावी मन फिरते
हृदयाचे स्पंदन मायेने, स्पर्शून कुठे ते गेले
प्रेमाचे देऊन नाव ठाव, फसवून कुठे ते गेले
मन आज न माझे राहिले, सोडून कुठे गेले
एक मी एक तू, एक प्रेम कधी
जुळले जे नाते, कळले ना कधी
माझ्यात प्रेम प्रेमात मी
घडले जे आज घडले ना कधी
मन गुंतले नभ रंगले, प्रेमाने हे जीवन सजले
स्वप्नात मी जे शोधिले, या क्षणात मनात रुजले
जन्मोजन्मीची बंधने, जोडून कुठे ते गेले
प्रेमाचे देऊन नाव ठाव, फसवून कुठे ते गेले
मन आज न माझे राहिले, सोडून कुठे गेले
शोधून मला मी हरलो, हरवून कुठे गेले
प्रीतीचे सारे रंग नवे, उधळून कुठे ते गेले
प्रेमाचे देऊन नाव ठाव, फसवून कुठे ते गेले
मन आज न माझे राहिले सोडून कुठे गेले