दिग्दर्शक - दत्ता धर्माधिकारी
कलाकार - जयश्री गडकर, रमेश देव
संगीतकार - दत्ता डावजेकर
गीतकार - ग. दि. माडगुळकर
वर्ष - १९६४
To Download This Song :
तिच्या घोवाला कोकण दाखवा
दावा कोकणची निळी निळी खाडी
दोन्ही तीराला हिरवी हरवी झाडी
भगवा अबोली फुलांचा ताटवा
कोकणची माणसं साधी भोळी
काळजात त्यांच्या भरली शहाळी
उंची माडांची जवळून मापवा
सोडून दे रे खोड्या साऱ्या
शिडात शिर रे अवखळ वाऱ्या
झणी धरणीला गलबत टेकवा