दिग्दर्शक - महेश सातोस्कर
कलाकार - रवींद्र मंकणी, अर्चना जोगळेकर, सुनील शेंडे, भावना, लालन सारंग, नयना आपटे, सुहास भालेकर, चंदू पारखी, मोहनदास सुखटणकर, पांडुरंग कुलकर्णी, कमलाकर सारंग
संगीतकार - पं. हृदयनाथ मंगेशकर
गीतकार - ग्रेस
वर्ष - १९८९
To Download This Song :
ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता...' या काव्याने घरोघरी पोहोचलेले, मराठी कवितेच्या दालनात स्वयंभूपणे गेली ४५ वर्षं अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ कवी माणिक गोडघाटे उर्फ ग्रेस यांचे निधन धक्कादायक आहे. ‘दुःखाचा महाकवी’ असं बिरुद मिरवणा-या कवी ग्रेस यांना गेल्याच महिन्यात अत्यंत मानाच्या साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
समकालीन कवींपेक्षा वेगळा विचार करून शब्दांच्या जगात लिलया वावरणारा हा जादूगार आज गेल्याने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. कवी ग्रेस मराठी साहित्य आणि काव्य क्षेत्रातील विलक्षण स्वप्न होते. या प्रतिभावंत कवीने त्यांच्या कवितेतील प्रत्येक शब्दाला नवीन अर्थ मिळवून दिला. मराठी साहित्यातील मानबिंदु मानले गेलेले कविवर्य ग्रेस यांच्या निधनामुळे मराठी कवितेतील खरेखुरे माणिक हरपले आहे. ओल्या वेळूची बासरी, वाऱ्याने हलते रान, संध्याकाळच्या कविता, चंद्रमाधवीचे प्रदेश, चर्चबेल यासारख्या दर्जेदार साहित्यकृतींच्या माध्यमातून ते मराठी मनांवर चिरंतन अधिराज्य गाजवत राहतील. कविवर्य ग्रेस यांना आदराची भावपूर्ण श्रद्धांजली..ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता
ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता
अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता