दिग्दर्शक - अवधूत गुप्ते
कलाकार - सचित पाटील, संतोष जुवेकर, पुष्कर शोत्री, सुनील तावडे, चिन्मय मांडलेकर
संगीतकार - अवधूत गुप्ते
गीतकार - गुरु ठाकूर
वर्ष - २०१०
To Download This Song :
आणि धुंदावती भाबडी लोचने
होतसे जीव का घाबरा सांग ना
सांग ना रे मना, सांग ना रे मना
श्वास गंधाळती शब्द भांबावती
रोम रोमातले कंपने बोलती
मोहरे मोहरे पाकळी पाकळी
भारलेल्या जीवा आवरावे किती
का अशा जागल्या सांग संवेदना
सांग ना रे मना, सांग ना रे मना
हे नवे भास अन ह्या नव्या चाहुली
ऐकू ये कोठूनी साद हि मलमली
गोठले श्वास अन स्पंदने थांबली
हे शहारे जणू रेशमाच्या झुली
आज ओथंबल्या का अशा भावना
सांग ना रे मना, सांग ना रे मना