दिग्दर्शक - अमित अभ्यंकर
कलाकार - नंदू माधव, चिन्मय संत, मधुरा वेलणकर, संतोष जुवेकर, अस्मिता जोगळेकर, संदीप मेहता, उदय सबनीस
संगीतकार - सलील कुलकर्णी
गीतकार - संदीप खरे
वर्ष - २०१२
To Download This Song :
एका दुर्गम वस्तीत राहणारा एक ध्येयवेडा शिक्षक आणि त्याच्या अगदी विरुद्ध टोकाच्या अवकाशात वावरणारा त्याचा विद्यार्थी, अशा जगण्याशी थेट भिडणाऱ्या आणि त्यांना एकत्र आणणाऱ्या त्यांच्या शाळेची एक धम्माल मजेशीर गोष्ट ‘जन गण मन’ या चित्रपटाद्वारे अमित अभ्यंकर यांनी प्रेक्षकांपुढे मांडली आहे. 'जन गण मन' कथा आहे एका आदिवासी भागात शिकवणाऱ्या एका शिक्षकाची, त्याच्या शाळेत शिकणाऱ्या एका पारधी पोराची आणि पाल्यावरच्या एका झोपडीत जगू पाहणाऱ्या त्याच्या कुटुंबाची.
चिडून नाही चालायचं लढाईला हवं
सावधान विश्राम विश्राम सावधान
टक्के गुर्जी एकदमच लई ताट मान
बगते काय माय तुला काय ठाव नाय
आमचा शाळेत स्वातंत्र्याची लई गम्मत हाय
पांढरा शर्ट हवा बोल्ला पांढरी चड्डी आन
एक साथ कवायत चलो दाणादाण
हातावर रोज एक संत्रा गोळी पडल
पेढे जिलब्या बतासेभी पोटभर मिळल
त्याचा साठी तरी माय जायला हवं