दिग्दर्शक - उमेश कुलकर्णी
कलाकार - दिलीप प्रभावळकर, नाना पाटेकर, डॉ. मोहन आगाशे, सोनाली कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी
संगीतकार - मंगेश धाकडे
गीतकार - सुधीर मोघे
वर्ष - २०११
To Download This Song :
या भजनात एक खूप छान अशी निरागसता आहे. देवाशी संवाद साधण्याचा प्रयत्न आहे.
देवाचा, देवस्थानाचा, देवाच्या वस्तूंचा बाजार,धर्माचाच बाजार आपल्याला नवा नाही. असे अनेक जागृत ’देवस्थानं’ आपल्या गल्लीबोळातही आहेत. त्यामागच्या माणसांची, तिथल्या मंडळींची, देवळांबाहेर पुजेचे साहित्य, प्रसाद, देवाच्या गाण्य़ांच्या कॅसेट्स विकणाऱ्या लोकांची मानसिकता, त्यांच्यातल्या हरवलेल्या भक्तांचा , एकूणातच हरवत चाललेल्या ’निस्वार्थ भक्तीचा’ शोध पुढच्या अनेक प्रसंगांमधे येतो. ’देवा तूला शोधू कुठं’ गाणारी गावातली साधी भजनी मंडळी ’थ्री इडियट्स’ च्या चालीवर देवाची गाणी बसवत असताना पाहिली की, देवाचा बाजार करू शकणारी माणसं समोरून पहाताना कितीही बोचली तरी कुठे न कुठे आपणही त्या ’सिस्टीम’चा भाग आहोत ही खंत मनात दाटते.
देव ही एक संकल्पना आहे. देवाचे असणे किंवा नसणे ही वैयक्तिक बाब आहे. आपल्यापेक्षा मोठी ताकद या जगात आहे कि जी आपल्याला आनंद, विश्वास आणि निर्भयता देते ती म्हणजे देव. कालानुरूप देवाची व्याख्या बदलत असते. जुन्या काळात, देव आणि दानव अथवा राक्षस यांची अस्तित्व मानले जायचे. आताच्या काळात आपल्याला जो मदत करतो, संकटातून सोडवतो तो देव तद्वत जो त्रास देतो तो राक्षस. अश्या या देवाला भेटण्याचा ध्यास प्रत्तेक मानवाला असतो.
कुठल्या रुपात
देवा तुला शोधू कुठं...अर शोधू कुठं
तेहतीस कोटी रूपे तुझी
तेहतीस कोटी नामे तुझी
परी तू अज्ञात...देवा
देवा तुला शोधू कुठं...अर शोधू कुठं
कोठे असशी तू आकाशी
कुठल्या गावी कोठे वससी
कुण्या देवळात...देवा
देवा तुला शोधू कुठं...अर शोधू कुठं
भले बुरे जे दिसते भवती
भले बुरे जे घडती भवती
तिथे तू दहा हात...देवा
देवा तुला शोधू कुठं...अर शोधू कुठं
स्वछंदी तू स्वतच असा का
येथे रमसी सांग उगा का
या बाजारात...देवा
देवा तुला शोधू कुठं...अर शोधू कुठं