संगीतकार - यशवंत देव
गीतकार - यशवंत देव
वर्ष - १९९७
To Download This Song :
स्पर्श सारेच सांगून जाती
लोचनाआड जातेस तेव्हा
पापणीला तुझा रंग येतो
आर्त कोमेजलेल्या मनाची,
पाकळी पाकळी खिन्न झाली
सांत्वनाच्या तुझ्या फुंकरीने
प्राण लेवून आली नव्हाळी
एक हुंकार देतो दिलासा
एक झुंकार गात्रांत गातो
माळ वैराण नि:श्वासताना
रानपक्षी कसा गात होता
काळरात्रीसही सोबतीला
रातराणी तुझा गंध होता
काल नि:श्वासलेला तराणा
आज विश्वास देऊन जातो
मोरपंखी खुणेसारखी तू
चित्त मोहून घेतो फुलोरा
अभ्र दाटून आले तरीही
तू ढगामागची चंद्रकोर
चांदण्याचा झुला हालताना
जीव भोळा शहारून जातो