संगीतकार - श्रीधर फडके
गीतकार - शांताराम नांदगावकर
वर्ष - २००२
To Download This Song :
त्या गंधातुन मोहरली माझी कविता
त्या झरणीतुन रूणुझुणला शब्द ह्रदयीचा
त्या शब्दातुन मोहरली माझी कविता
हे गगन निळे चांदण्यात भिजुनी चिंबले
त्या चांदण्यास कनकाचे साज लाभले
त्या चांदण्यास कनकाचे साज लाभता
त्या साजातुन मोहरली माझी कविता
का पानफुलं लज्जेने चूर जाहले
का सळसळत्या वा-याचे नुपुर वाजले
त्या नुपुरांचे किणकिण किण सूर बहरता
त्या बहरातुन मोहरली माझी कविता
बघ उमलताच कलिकेची पाकळी जशी
का शब्द शब्द फुलवित असे काव्य मानसी
ह्या दोन मनी काव्याचा भाव लोटता
त्या भावातुन मोहरली माझी कविता