संगीतकार - श्रीनिवास खळे
गीतकार - संत तुकाराम
वर्ष - १९९०
To Download This Song :
"श्रावणात घन निळा’ असो किंवा ‘निज माझ्या नंदलाला’ असो, ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ असो किंवा ‘सावळे सुंदर रुप मनोहर’ असो, आजही ही गीते चिरतरूण आहेत. या व यांसारख्या कित्येक गीतांना स्वरबद्ध करणारे, मराठी संगीतविश्वातील हिरा, आपले सर्वांचे लाडके खळे काका अर्थात ज्येष्ठ संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. मराठी संगीतविश्वातील एक ताराच जणू निखळला..
कालच बाप्पा घरी आले असताना, सर्वत्र चैतन्याचे वातावरण असताना ही बातमी खरच मनाला चटका लावून गेली. खळे काकांना आदराची भावपूर्ण श्रद्धांजली..ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
शेवटचा दिस गोड व्हावा
आता निश्चितीनें पावलों विसांवा
खुंटलिया धांवा तृष्णेचिया
कवतुक वाटे जालिया वेचाचें
नांव मंगळाचे तेणें गुणें
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी
आतां दिवस चारी खेळीमेळी