संगीतकार - संदीप खरे
गीतकार - संदीप खरे
वर्ष - २००३
To Download This Song :
कुण्या काळचे , पाणी डोळ्यात येते
बरा बोलता बोलता , स्तब्ध होतो
कशी शांतता , शून्य शब्दांत येते
कधी दाटू येता , पसारा घनांचा
कसा सावळा रंग , होतो मनाचा
असे हालते आत हळूवार काही
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा
असा ऐकू येतो , क्षणाचा इशारा
क्षणी व्यर्थ होतो दिशांचा पसारा
नभातून ज्या रोज जातो बुडूनी
नभाशीच त्या मागू जातो किनारा
न अंदाज कुठले न अवधान काही
कुठे जायचे , यायचे भान नाही
जसा गंध निघतो, हवेच्या प्रवासा
न कुठले नकाशे न अनुमान काही
कशी ही अवस्था कुणाला कळावे
कुणाला पुसावे कुणी उत्तरावे
किती खोल जातो, तरी तोल जातो
असा तोल जाता कुणी सावरावे